भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त २० व २१ सप्टेंबर रोजी विशेष आयोजन
युवा नेते विशाल परब यांच्या संकल्पनेतून कॅरम स्पर्धा आयोजित
सावंतवाडी :
भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत भाजप युवानेते विशाल परब यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने सिंधुदुर्ग जिल्हा वरिष्ठ व कनिष्ठ गट कॅरम स्पर्धेचे आयोजन दिनांक २० आणि २१ सप्टेंबर २०२५ रोजी सावंतवाडी जिमखाना येथे करण्यात आले आहे. १८ वर्षांखालील मुले व मुली आणि खुला गट अशा वयोगट या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. या स्पर्धेमधील विजेत्यांना खुला गट १ ते ८ आणि ज्युनिअर गट १ ते ४ यांना रोख रक्कम आणि प्रथम दोन क्रमांकाच्या विजेत्यांना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क रु. १५०/- व नोंदणी शुल्क रु. १०० /- रुपये ठेवण्यात आले असून गुरुवार दि. १८ सप्टेंबर २०२५ संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत इच्छुक स्पर्धकांनी आपली नाव नोंदणी खालील क्रमांकावर करावीत तसेच या स्पर्धेमधे जास्तीत जास्त मुला- मुलींनी सहभागी व्हावे असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अवधूत भणगे, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत आणि युवा नेते श्री. विशाल परब यांनी केले आहे.
