You are currently viewing दर्शन घडता तुझे सखे

दर्शन घडता तुझे सखे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*दर्शन घडता तुझे सखे*

 

दर्शन घडता तुझे सखे

आरसा सुध्दा मोहरतो

असून फुले ती नकली

सुगंध मजला आवडतो

//1//

करते घायाळ नजर सखे

नको मजला *डरडावूस*

करून झाले काव्य तूजवर

पुरवत असतो *रोज हौस*

//2//

मोहीत करते प्रतिबिंबही

प्रसूत होते कविता सत्वर

असून नकली सुगंध येतो

खिळून बसते दृष्टी त्यावर

//3//

कोण हुंगतो नकली गजरा

समीर गुटमळतो कायमचा

नाही कोणी “त्याला बघत”

छुपा रुस्तुम *प्रेम नगरचा*

//4//

रूप खुलवते तुझे अधीक

रचना “कुंतलांची” काळ्या

जरी भासली आज वेगळी

वाजवल्या मनात *टाळ्या*

//5//

नकोच कसला भडक मेकप

साधी माणस दिसतात गोड

कितीही असले अवघड गड

करीत नाहीत नुसती बडबड

//6//

 

विनायक जोशी 🖋️ठाणे

मीलनध्वनी/9324324157

प्रतिक्रिया व्यक्त करा