*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”शंख”*
शंखास सर्व पुजांमध्ये मानाचे स्थान
बहु उपयोगी करी सर्वांचे रक्षण IIधृ II
शंख सागर तळाशी होई उत्पन्न
समुद्र मंथनातील चौदा पैकी एक रत्न
पन्हळ अग्र पार्श्वबाजू प्रकार तीन II1II
शंखासुर दैत्य सागरातून होई उत्पन्न
शंखासुराने केले वेदांचे अपहरण
विष्णूनी मत्स्यरूपे केले त्याचे शीर संधान II2II
शंखे प्रार्थिले विष्णू हाती यावे मरण
शंख वर मागे वाम हाती करावे धारण
शंख जले होते देव स्नान पूजा संपन्न II3II
शंख देव स्वरूप चंद्रसूर्यासमान
शंखात गणेश विष्णू देवी मोती वर्ण
शंखमणी सुक्त दक्षिण वर्ती शंख महान II4II
पृष्ठभागात ब्रह्मदेव मध्यभागी वरुण
अग्रभागी गंगा सरस्वती वसती स्थान
विष्णू आज्ञे सर्व तीर्थ शंखात विराजमान II5II
भीष्माचार्य ऋषिकेश भीम नकुल अर्जुन
युधिष्ठीर सहदेवे वाजवले शंख सिंहनाद
पंचजन्य पौंड्रय सुघोष मणीपुष्पक देवदत्तII6II
सर्व कार्यात शंखध्वनीचे महत्व अनन्य
कंपनाने मिळे ऊर्जा शुद्ध वातावरण
शंखनाद विजय सुखसमृद्धीचे लक्षणII7II
शंख मानी अडणी वर वसे स्थानापन्न
लक्ष्मीचा सहोदर करी मंगल वातावरण
रक्षण करी देई आरोग्य धान्य यश ज्ञानII8II
काव्यः अरुण गांगल.श्री कर्जत, रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.

