पुणे:
सातारा येथे होऊ घातलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष पानिपतकार मा.विश्वासराव पाटील यांच्या निवडीबद्दल महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे या संस्थेच्या वतीने संस्थेच्या उपाध्यक्षा ॲड.संध्या गोळे व ज्येष्ठ कवयित्री ऋचा कर्वे यांच्या हस्ते मानाची शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी महाकवी कालिदास संस्थेचे इतर सदस्य देखील उपस्थित होते. सदरचा सन्मान मराठी साहित्य परिषद पुणेच्या सभागृहात करण्यात आला.
पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात महामंडळाच्या झालेल्या बैठकीत विविध साहित्यिकांच्या नावांवर चर्चा होऊन अखेरीस पानिपतकार मा.विश्वास पाटील यांचे नाव सातारा, म्हणजेच मराठा साम्राज्याची एकेकाळची राजधानी असलेल्या नगरीत होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निश्चित करण्यात आले होते. या निवडीमुळे मराठी साहित्य विश्वात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे मान.विश्वासराव पाटील यांच्या या निवडीबद्दल महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
