सावंतवाडीत गणपती मुर्तीकाराची आत्महत्या
सावंतवाडी :
शहरातील जुना बाजार परिसरात राहणाऱ्या एका गणपती मुर्तीकाराने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजेश शिवाजी पांगम (वय ४७) असे मृताचे नाव असून, त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
ही घटना आज सायंकाळी उघडकीस आली. राजेश पांगम यांनी त्यांच्या जुना बाजार येथील राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवले. नातेवाईकांनी तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या घटनेची माहिती मिळाल्यावर माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर, नंदू गावडे, गणेश मिशाळ, सत्यवान बांदेकर, रवी जाधव, परेश बांदेकर आणि हेमंत रंकाळे यांनी रुग्णालयात धाव घेतली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, अनिल धुरी आणि मयुर निवडेकर यांनी या घटनेचा पंचनामा केला. पांगम यांची शहरात गणेश मूर्तीशाळा होती. या आत्महत्येमागचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत.
