You are currently viewing दाभोली तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी दादा सारंग यांची बिनविरोध निवड

दाभोली तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी दादा सारंग यांची बिनविरोध निवड

दाभोली तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी दादा सारंग यांची बिनविरोध निवड

जिल्हास्तरावर निवडीचे होत आहे कौतुक

दाभोली

दाभोली ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये युवा सामाजिक कार्यकर्ते श्री. दादा सारंग यांची महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. याआधी ते तंटामुक्ती समितीचे सदस्य म्हणून कार्यरत होते. त्यांच्या सामाजिक कार्याचा व गावातील योगदानाचा विचार करून ग्रामसभेने एकमताने त्यांची अध्यक्षपदासाठी निवड केली.

या वेळी सरपंच श्री. उदय गोवेकर, उपसरपंच श्रीकृष्ण बांदवलकर, माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य श्री. एकनाथ राऊळ, सदस्य अवधूत राऊत, माजी पंचायत समिती सदस्य श्री. समाधान बांदवलकर, माजी सरपंच श्री. गुरुनाथ कांबळी, अमित दाभोलकर, विष्णू दाभोलकर, देवेंद्र राऊळ, भूषण दाभोलकर, विस्तार अधिकारी श्री. पिंगुळकर, पोलीस पाटील जनार्दन पेडणेकर, तलाठी वेतुरकर मॅडम, तसेच ग्रामस्थ व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दादा सारंग यांच्या या निवडीमुळे गावात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे. त्यांचे नेतृत्व गावातील सामंजस्य, शांती व विकासासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या निवडीबद्दल जिल्हास्तरावरही कौतुक होत आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा