वैभववाडी महाविद्यालयात हिंदी दिवस संपन्न
वैभववाडी
दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात हिंदी काव्य वाचनाने हिंदी दिवस महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एन. व्ही. गवळी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. एम. आय. कुंभार, हिंदी विभाग प्रमुख सहा. प्रा. ए. एम. कांबळे व इंग्रजी विभागाचे सहा. प्रा. डॉ. संतोष राडे उपस्थित होते.
हिंदी भाषेचे महत्व, हिंदी दिवसाचा उद्देश व कार्यक्रमाची रूपरेषा प्रास्तविकेतून हिंदी विभाग प्रमुख सहा. प्रा. ए. एम. कांबळे यांनी अधोरेखित केली.
या कार्यक्रमात महाविद्यालयातील श्रुती सुर्वे, मिसबा मुल्ला, साक्षी कातकर, रोशनी मंचेकर, सायली सावंत, सृष्टी बागवे, श्रेया पालकर, संपदा पुजारी, गायत्री टक्के, मीनल पाळेकर, केतकी फाळके, रुचिका कदम, शुभम लाड, अनिकेत कुलकर्णी, संस्कृती कांबळे व अनुराग शेट्ये यांनी हिंदी आशय घन कविता सादर केल्या तसेच सहा. प्रा. डॉ. राडे व डॉ.एम. आय. कुंभार यांनी या निमित्ताने हिंदी कविता सादर केल्या.
आपल्या अध्यक्षीय मंतव्यात डॉ. एन. व्ही. गवळी यांनी हिंदी, मराठी, इंग्रजी भाषा कशा प्रकारे महत्त्वाचे आहेत यावर भाष्य करत एका मालवणी कवितेचे सादरीकरण केले.
या कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सहा. प्रा. एन. ए. कारेकर यांनी केले
