*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम गझल*
“पादाकुलक वृत्त”
*सोयीने वापरतो जाती*
रंग पाहुनी झेंडा हाती
सोयीने वापरतो जाती
शीर घेउनी तळहातावर
मराठमोळी लढली छाती
वारीपुरते समानधर्मी
नंतर पक्क्या जाती पाती
हिशश्यासाठी अडून बसली
अवघड सारी झाली नाती
पिढ्यापिढ्यानी कसली,जपली
नका विकू हो काळी माती
फुले उमलली देहावरती
तुझ्यासवे ती गाणे गाती
कुठवर पाहू वाट तुझी रे
तेल संपले विझल्या वाती
चारित्र्याच्या तोंडी बाता
खंबा जवळी दिसतो राती
श्रीनिवास गडकरी
रोहा पेण पुणे
9130861304
केवळ नावासहितच पुढे पाठवावे
@ सर्व हक्क सुरक्षित

