You are currently viewing संजय राऊत यांची अजितदादा पवारांवरील घृणास्पद टीका ही राजकीय विदूषकी व महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे – अर्षद बेग

संजय राऊत यांची अजितदादा पवारांवरील घृणास्पद टीका ही राजकीय विदूषकी व महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे – अर्षद बेग

सावंतवाडी:

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर संजय राऊत यांनी केलेली घृणास्पद टीका ही केवळ उथळ राजकारणाचे लक्षण असून महाराष्ट्राच्या जनतेचा,तसेच स्वातंत्र्य संग्रामाचा अपमान आहे.अशी घृणास्पद व बेताल टीका आम्ही याचा तीव्र शब्दांत निषेध करतो,असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते अर्षद बेग यांनी प्रसिद्धिपत्रक काढुन व्यक्त केली.

बेग पुढे म्हणाले, अजितदादा पवार हे पाच दशकांहून अधिक काळ महाराष्ट्राच्या जनतेसाठी कार्यरत आहेत. शेतकरी, कामगार, तरुण, महिला आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर त्यांनी ठोस भूमिका घेतली आहे. महाराष्ट्राच्या विकासाचा पाया रचणाऱ्या अशा नेत्यावर देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे ही संजय राऊत यांची राजकीय दिवाळखोरीच आहे.

संजय राऊत यांच्याकडे आज कोणताही सकारात्मक मुद्दा उरलेला नाही. स्वतःची राजकीय जमीन घसरत चालल्यामुळे ते केवळ वादग्रस्त, घाणेरडी वक्तव्यं करून मथळे मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्राची जनता त्यांच्या बोलण्याला आता गांभीर्याने घेत नाही.

अजितदादा पवार हे राष्ट्रभक्तीचे प्रतीक आहेत. त्यांनी सातत्याने विकास, स्थैर्य आणि रोजगार निर्मितीचा ध्यास घेतला आहे. त्यांच्या कामगिरीला पर्याय नसल्यानेच राऊत यांना वैयक्तिक हल्ल्यांचा मार्ग स्वीकारावा लागतो.

महाराष्ट्राची जनता आज विकासाकडे पाहते, रोजगाराच्या संधींकडे पाहते आणि स्थैर्याच्या दिशेने पाऊल टाकणाऱ्या नेतृत्वाकडे पाहते. तिला संजय राऊत यांची राजकीय नौटंकी व विदूषकी मान्य नाही. अजितदादा पवारांवर केलेला अपमान हा म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेवर केलेला अपमान आहे आणि तो जनता कधीही सहन करणार नाही.

आम्ही या गलिच्छ वक्तव्याची कडक शब्दांत निषेध करतो आणि संजय राऊत यांनी तात्काळ महाराष्ट्राच्या जनतेची आणि अजितदादा पवारांची माफी मागावी,अशी ठाम मागणी करतो. अन्यथा जनता त्यांना राजकीय पातळीवर धडा शिकवेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा