यमुनानगर निगडी – युवा फाऊंडेशनच्या घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेच्या पारितोषक वितरणाचा कार्यक्रम रविवार १४ सप्टेंबर २०२५ रोजी विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभागृह यमुना नगर निगडी येथे संपन्न झाला.
श्री अजिंक्य सुलभाताई रामभाऊ उबाळे युवा फाउंडेशन तर्फे गणेशोउत्सवात घरगुती गणपती सजावट स्पर्धा घेण्यात आली. सजावट ही पर्यावरण पूरक आकर्षक व सामाजिक संदेश देणारी असावी असे आवाहन करण्यात आले होते. या स्पर्धेत ११९ यमुनानगर मधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उत्साहाने सहभाग घेतला.
या स्पर्धेमध्ये खालील स्पर्धकांनी यश संपादन केले.
पहिले बक्षीस विभागून नयना पारखे सजावट सरदार वल्लभभाई पटेल, कविता काळे सजावट गिरनार पर्वत, दुसरे बक्षीस मोनाली दाभोळे घर सजावट, यश भालेराव सजावट ऑपरेशन सिंदूर, तिसरे बक्षीस समीक्षा उनवणे सजावट कृष्ण लीला, संध्या पवार सजावट जंगल.
स्पर्धकांनी भाग घेतलेला सर्व कार्यक्रम व्हिडिओ शोद्वारे प्रोजेक्टर वर दाखविण्यात आला.
युवा फाउंडेशनचे किरण वाडकर, अनिकेत वेरुणकर, अमित शिंदे, सचिन मसने व प्रणव नांगरे यांच्या सर्व कार्यकारणी टीमने सुयोग्य असे नियोजन केल्यामुळे कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. या कार्यक्रमासाठी श्री गजानन ढमाले अध्यक्ष यमुना नगर ज्येष्ठ नागरिक संघ, श्री अंकुश जगदाळे अध्यक्ष विठ्ठल रुक्मिणी मंदिर सेवा समिती ट्रस्ट, श्री गणेश इंगवले, श्री आप्पा काळोखे, शशिकला उभे, भारती चकवे या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सर्व सहभागी स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू देऊन कार्यक्रम संपन्न झाला.
