ओसरगाव शाळेच्या प्रगतीसाठी माजी सरपंच बबली राणे यांचा पुढाकार
ओसरगाव :
गावातील शाळेवर मनापासून प्रेम करणाऱ्या ओसरगावचे माजी सरपंचश्री.बबली राणे यांनी पुन्हा एकदा आपल्या कार्यातून शाळेप्रती जिव्हाळा दाखवला आहे. त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन गावातील तीन नवीन विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळा ओसरगाव क्रमांक १ येथे दाखल करून दिले.
या नव्या प्रवेशामध्ये –
1️⃣ मनीषा सुनार – इयत्ता सहावी
2️⃣ गंगा सुनार – इयत्ता चौथी
3️⃣ दीपेंद्र थापा – इयत्ता तिसरी
या तीन विद्यार्थ्यांना शाळेच्या कुटुंबात सामील करून देत, शाळेतील विद्यार्थीसंख्या वाढवण्यास त्यांनी थेट हातभार लावला आहे. शिक्षणाच्या महत्त्वाची जाणीव निर्माण करून पालकांना पटवून देणे ही खऱ्या अर्थाने समाजकार्याची पावले आहेत, असे ग्रामस्थांनी गौरवोद्गार काढले.
मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती तसेच सर्व पालक यांच्या वतीने श्री.बबली राणे यांचे मनःपूर्वक आभार व हार्दिक अभिनंदन करण्यात आले. शाळेच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांचा हा पुढाकार प्रेरणादायी ठरत असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले.
सध्या नेपाळमध्ये भयानक परिस्थिती असताना आमच्या गावातील नेपाळी जोडपे एका हॉटेलमध्ये पोटापाण्यासाठी काम करत आहेत त्यांची तीन छोटी मुले शिक्षणापासून वंचित होती तात्काळ त्यांना समोरच्याच जिल्हा परिषद ओसरगाव तलाव शाळा नंबर एक मध्ये आज दाखल करून घेतले
