सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यात मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार व उत्तम शिक्षण दिले जाईल,असा विश्वास माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज येथे व्यक्त केला. दरम्यान चिपी विमानतळाचे उद्घाटन आणि जिल्ह्यात होणारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या विषयावरून शिवसेनेचे नेते जनतेची दिशाभूल करीत आहे.असा आरोप करत शिवसेना प्रत्येक विकास कामाला विरोध करते, मात्र नंतर आयत्या बिळावर नागोबा असते,असाही टोला त्यांनी यावेळी लगावला.पडवे येथील मेडिकल कॉलेजच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.