—- अभियंता दिनाचा सुवर्णयोग —-
श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे संस्थापक शिक्षणमहर्षि डॉ पंजाबराव शामराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख व अमरावतीचे माजी खासदार तथा माजी राज्यपाल स्व रामकृष्ण सुर्यभानजी उपाख्य दादासाहेब गवई यांचे कौटुबिक सख्य सर्वदूर देशात परिचीत आहे . परंतु वेळोवेळी कार्याने सुद्धा डॉ भाऊसाहेब व दादासाहेब यांनी प्रदीर्ध काळ कार्य केलेले आहे . डॉ भाऊहेबांच्या निधनानंतर दादासाहेब गवई यांचे श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती व सुप्रसिद्ध हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती या दोन संस्थेकडे विशेष लक्ष असल्याचे सर्वश्रूत आहे . दादासाहेबांनी घडविलेली सर्व व्यक्तिमत्वे तथा संस्था ह्या या महामानवानंतर त्यांच्या अर्धांगिणी प्राचार्या डॉ कमलताई गवई यांनी समर्थपणे सांभाळल्या . स्वतःच्या मुलांना अतिशिक्षीत करून उंच शिखरापर्यंत पोहचविणाऱ्या या मातेने “अवधे जगचि माझा परिवार ” या उक्तीला शिरसावंद ठेऊन उपेक्षित, अनाथ, गोरगरीब यांना मायेचा ओलावा कधीही कमी पडू दिला नाही इतके हे वृद्धिंगत जीवन जीवनाच्या इतक्या लांब पलल्यावर सुद्धा निखळ व पवित्र पणे वाहत आहे ही अभिमानाची बाब ठरते . मला आय ए एस अमरावती संस्थेचा डॉ . पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार जाहीर होताच या वयात अमरावती वरून थेट माझ्या माहुली ( धांडे ) या दर्यापूर तालुक्यातील गोरक्षणला भेट देऊन व आल्या बरोबर गोरक्षण परिसरात वृक्षारोपण करून माझा सत्कार केला . यापुढे त्यांच्याच शुभहस्ते मला हा पुरस्कार अमरावती येथे प्रदान करण्यात आला ही अजूनही भाग्याची गोष्ट ठरली. मुलगा देशाच्या अती उच्चपदी विराजमान असून तसेच स्वतःच्याच इतक्या शैक्षणीक संस्था असून सुद्धा ही वृद्ध आई सर्व सुखसोयी बाजूला ठेऊन जेंव्हा समाज सेवमध्ये मग्न असते हे मौलीक कार्य फक्त या पृथ्वीतलावार एका महत्तम तथा समर्थ आईचेच असू शकते हे सिद्ध होते . माझा आयोजन सदस्य म्हणून सहभाग असलेल्या दोन प्रमुख कार्यक्रमांच्या स्थळी सातत्याने एक दोन तीन दहा नव्हे तर अठ्ठावीस वर्षे स्व . दादासाहेब काळमेघ स्मृती दिनाच्या कार्यक्रमात तसेच पाच वर्ष पद्मभूषण डॉ विजय भटकर यांच्या मुरंबा गौरव महोत्सवात आवर्जून हजेरी लावलेली मी स्वतः अनुभवली आहे . सहाव्या वर्षी अंथरुणावर आजारी असतांना घरून दुसऱ्या व्यक्तीच्या हाताने सत्मानपत्र -शाल – श्रीफळ मुरंब्याला पाठवून गजानन जवळ दया तो बरोबर माझ्या वतीने डॉ भटकर यांना अर्पण करेल ही यशस्वी जुळवणी करणे हे प्रामाणिक मायेच्या पांघरुणाचे उदाहरण आहे . फक्त भूषण, राजेंद्र व किर्ती च नव्हे तर दादासाहेब काळमेघांचा हेमंतही मुलासारखाच हे संबंध जपणारी माता काही औरच म्हणावी लागेल. आम्ही विदर्भवासी मायमाऊले धन्य झालो आहोत . तुझ्या प्रेमाने . आम्हाला सार्थ अभिमान आहे या कार्य समर्थता जीवन प्रवासाचा . गोडवा गाऊ न गाऊ किती ग माये तुवा?किती वणवण केली समाज उत्थापनेसाठी, घडविण्यासाठी ? हे सर्व ऋण आम्ही नाही फेडू शकणार माऊले . मला आनंद आहे की जी आई आम्हाला तोंड भरून मुलगाच मानते ती मी प्राध्यापक असलेल्या महाविद्यालयात माझ्याच कार्यरत विभागाने आयोजित कार्यक्रमात येऊन आम्हाला परत एका संबोधनार आहे . आम्हा अभियंत्यांना ही गौरवाची बाब आहे . आमची शिवाजी शिक्षण संस्था हे गवई कुटुंबाचे हक्काचे घर आहे . आम्ही सर्व आज धन्य धन्य होणार आहोत . सबका मंगल हो हा अमृत मंत्र परत एकदा श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या बाभूळगांव – अकोला येथील भव्य दिव्य परिसरात शंखनाद करणार आहे . आमचा अकोला शिवपरीवार, संस्थेचे सभासद, आप्तेष्ट, प्राध्यापक, कर्मचारी वृंद तथा मोठ्यासंख्येने असलेले महाविद्यालयीन विद्यार्थी एक उत्युंग व्यक्तीमत्वाची धनी असलेल्या मातेचे दर्शन घेण्यास उत्सुक आहेत . मी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाचा अध्यक्ष या नात्याने मा . प्राचार्या डॉ कमलताई रामकृष्ण गवई यांचे आगमना प्रित्यर्थ स्वागत करतो .
— प्रा गजानन भारसाकळे
अध्यक्ष माजी विद्यार्थी संघटना, अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय, बाभूळगांव – अकोला
9552226925
