*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी वि ग सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*परमसुख*
〰️〰️〰️
स्मृतीलहरींच्या लाटांवरती
हृदयस्थ आठवांचाच झुला
मनात माझ्या नित्य झुलता
क्षणक्षण जगविती जीवाला….
झुलव्याचे प्रीतस्पर्श लाघवी
जागविती अंतरी अव्यक्ताला
शब्दभावनांना फुटता पालवी
पाझर फुटतो तो भावगीताला….
भावनांची , फुले सुंदर कोमल
गंधाळीती अंतरात आत्म्याला
आत्मसुखाचा निर्मली निर्झर
आव्हान असते स्वर्गसुखाला….
परमात्म्याच्याच परमसुखाचा
दृष्टांत हा प्रत्येक जीवात्म्याला
कशास उगाला करावीच चिंता
नित्य स्मरत रहावे दयाघनाला
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*©️ वि.ग.सातपुते.( भावकवी)*
📞 *९७६६५४४९०८*

