You are currently viewing “पुण्याची ऐतिहासिक भ्रमंती:

“पुण्याची ऐतिहासिक भ्रमंती:

“पुण्याची ऐतिहासिक भ्रमंती: छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना देत इतिहासाचे दर्शन”

पुणे

पुण्यातील विविध ऐतिहासिक व धार्मिक स्थळांना भेट देत, छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, बलिदान आणि इतिहासाचे सजीव दर्शन अनुभवण्यात आले. या ऐतिहासिक भ्रमंतीत तुळापुर, थेऊर आणि मोशी या तीन महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश होता.

🔶 तुळापुर: इतिहासाच्या साक्षीने नतमस्तक

सकाळी सर्वप्रथम छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असलेल्या तुळापुर येथे भेट देण्यात आली. संभाजी महाराजांच्या बलिदानाने पावन झालेल्या या भूमीत “हाती घोडे तोफ तलवारे… पण जंजीर में जकड़ा राजा…” या ओळी वाचून उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. याच ठिकाणी त्यांचे विश्वासू कवी कवी कलश यांचीही समाधी आहे. सर्व कुटुंबीयांनी समाधीस्थळी नतमस्तक होत, डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी केली.

🔶 श्री चिंतामणी गणपतीचे दर्शन – श्रद्धेची अनुभूती

यानंतर थेऊर येथील श्री अष्टविनायकांपैकी एक – चिंतामणी गणपती मंदिर येथे दर्शन घेण्यात आले. मंदिर परिसरातील स्वच्छता, शिस्तबद्ध व्यवस्था आणि भक्तीभाव अनुभवत सर्वांनी “श्री गणपती बाप्पा मोरया” चा जयघोष केला.

🔶 मोशी: जगातील सर्वात मोठा संभाजी महाराजांचा पुतळा

या भ्रमंतीतील सर्वात उल्लेखनीय ठिकाण म्हणजे मोशी येथील संभाजी महाराजांचा भव्य पुतळा. आमदार महेशदादा लांडे यांच्या पुढाकाराने उभारला जात असलेला जगातील सर्वात मोठा राजांचा पुतळा हे या भागाचे विशेष आकर्षण ठरले. अत्यंत सुबक व भव्य पुतळा अंतिम टप्प्यात असून, नजरेच्या टप्प्यात न बसणारी त्याची विशालता थक्क करणारी आहे.

यावेळी ३,००० ढोल, टिमक्या, झांजा आणि झेंडे यांच्या गजरात संभाजी महाराजांना मानवंदना देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. या अद्वितीय उपक्रमासाठी आमदार महेश लांडे यांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा