You are currently viewing ओटवणे-करमळगाळू रस्त्यावर रात्री अजगराचे दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

ओटवणे-करमळगाळू रस्त्यावर रात्री अजगराचे दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

ओटवणे-करमळगाळू रस्त्यावर रात्री अजगराचे दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

ओटवणे (ता. सावंतवाडी),
करमळगाळू रस्त्यावर गुरुवारी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास ८ ते १० फुट लांबीचा भला मोठा अजगर आढळून आला. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सदर रस्ता कॅनॉलजवळून जात असल्यामुळे, या भागात साप, अजगर, व अन्य सरपटणाऱ्या प्राण्यांचे प्रमाण वाढले आहे. अशा प्राणी दिवसा तसेच रात्रीच्या वेळीही बाहेर पडताना दिसतात. विशेषतः रात्रीच्या वेळेस ते मानवी वस्तीत शिरल्यास पाळीव जनावरे तसेच माणसांनाही धोका निर्माण होऊ शकतो.

अजगराचे असे रस्त्यावर आढळणे नवीन नसले, तरीही यावेळी त्याचा आकार आणि वेळ लक्षात घेता, स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या परिसरात झाडी व जंगल भाग असल्यामुळे या प्राण्यांचे वास्तव्य अधिक असून, सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

स्थानिक नागरिकांनी वनविभागाकडे त्वरित सूचना दिली असून, अजगराला सुरक्षितपणे जंगलात सोडण्याची कार्यवाही सुरू आहे.
स्थानिक प्रशासन आणि वनविभागाने या प्रकारांकडे गांभीर्याने लक्ष देत, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा