*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कोण कसं काय..?*
कोण कसं काय….
त्या नजरेला कळत हो
म्हणून दोन पावलांमधे अंतर असत
नाहीतर या कलीयुगात
कोणी कुणाला आपलं म्हणत का?
तोंडावर किती गोड गोड बोलता राव
काय तर आपलेपणाचा तो
नुसताच देखावा असतो हो
मागून मग अरेरावी करायची
पाठ फिरवली की वाट वेगळी धरायची
आपलेही आपले नसतात राव
पाहून वाट चुकवतात
मात्र काहीतरी खलबत मनात असते
रोज दिसतात बोलतात भेटतात हो
आतली गाठ काही सुटत नसते
बरं वाईट काय ते दिसत खरं हो
पण कळत काहीच नाही
कसं ओळखायचं प्रश्न काही सोपा नसतो
लवलेश कसलाच नाही राव
कंटाळवाणा भाव असतो.
डोळे उघडे ठेवून बघावं हातचं राखून ठेवाव
केसांनी गळा कापतात म्हणे
तेव्हढ मात्र पारखून घ्यावं
अहो विश्वासच भरवशाचा राहिला नाही
नाहीतर या कलियुगात माणसा माणसात
अंतर्गत विभाजन झालं असतं का?
*संजय धनगव्हाळ*
*(अर्थात कुसुमाई)*
९४२२८९२६१८
९५७९११३५४८

