*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”पितृ ऋण”*
बाबा उमद्या प्रेमाची येते आठवण
हसते खेळते ज्ञानविश्वाचे प्रांगणIIधृII
खंबिरता निष्ठा जिद्दीची शिकवण
अनुभवाचे तुम्ही ग्रंथ संयमांचे कुंपण
कर्तव्य पालक घराचे करती रक्षणII1II
घरासाठी जमवी काडी-काडी उन्हात
संसारासाठी उपसती अपार कष्ट
तारेवरची कसरत घेती सांभाळूनII2II
धरती मातेच्या ओलाव्याचे शिंपण
दृढतेचे विश्वासाचे असते कोंदण
आनंदाचे गोंदणं करिती पालन पोषणII3II
वडील पुस्तक अनुभव लिहिले ज्यांत
झेलत राहिले कुटुंबासाठी आव्हानं
पाया छप्पर भिंत सांभाळती घरपणं II4II
श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.

