फोंडाघाटचा अभिमान!
NCC कॅडेट कु. मनस्या फाले हिची थल सैनिक राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेत सुवर्णपदकासह ऐतिहासिक कामगिरी!
फोंडाघाट
फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी व न्यू इंग्लिश स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, फोंडाघाटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवण्याजोगा क्षण आज सर्वांच्या दृष्टीसमोर आला आहे.
शाळेच्या इयत्ता 9वी मधील NCC कॅडेट कु. मनस्या निलेश फाले हिने दिल्ली येथे पार पडलेल्या थल सैनिक राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवत एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
या कामगिरीमुळे फक्त फोंडाघाटच नव्हे, तर सिंधुदुर्ग जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. कु. मनस्या हिची ही यशस्वी वाटचाल सर्वच विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
कु. मनस्याच्या यशात सामाजिक कार्यकर्ते व फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे माजी खजिनदार मा. श्री. अजित नाडकर्णी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांनी यापूर्वी मनस्या फालेचा सत्कार केला होता आणि प्रशिक्षण काळात कोणतीही गरज भासल्यास “संपर्क करा,” असे सांगून आवश्यक मदतीसाठी पुढाकार घेतला होता. त्यांनी सन्मानचिन्ह आणि सहाय्यही दिले होते, हे विशेष उल्लेखनीय.
या ऐतिहासिक सुवर्णयशाबद्दल फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे
चेअरमन मा. श्री. म.ज. सवंत,
सेक्रेटरी मा. श्री. चं.श. लिंग्रस,
खजिनदार मा. श्री. वा.रा. तयशेटे,
शाळा समिती चेअरमन मा. श्री. द.दि. पवार,
मा. संचालक मंडळ,
मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग,
तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.
🎉 मनस्या फाले हिच्या या सुवर्णमय यशामुळे फोंडाघाटचा झेंडा देशपातळीवर फडकला असून, ती भविष्यात आणखी यशाचे शिखर गाठो, हीच शुभेच्छा!

