You are currently viewing गोवा राज्यातील विविध विरोधी पक्षांच्या स्थानिक परप्रांतीय प्रश्न उपस्थित करत केलेल्या विरोधामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणारी MRF नोकर भरती मेळावा रद्द

गोवा राज्यातील विविध विरोधी पक्षांच्या स्थानिक परप्रांतीय प्रश्न उपस्थित करत केलेल्या विरोधामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणारी MRF नोकर भरती मेळावा रद्द

*गोवा राज्यातील विविध विरोधी पक्षांच्या स्थानिक परप्रांतीय प्रश्न उपस्थित करत केलेल्या विरोधामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणारी MRF नोकर भरती मेळावा रद्द*

*मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांची माहिती.*

मनसे सिंधुदुर्गच्या वतीने शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी एमआरएफ गोवा येथील कंपनी मध्ये प्रक्षिणार्थी भरती मेळावा आयोजित करण्यात आला होता. सदर मेळावा आयोजित करताना कोणतेही शुल्क न आकारता विनामूल्य सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांना रोजगाराच संधी मिळावी हा प्रामाणिक हेतू होता. आणि यासाठी एमआरएफ गोवा कंपनी च्या सोर्सिग युनिट सोबत रितसर चर्चा करून नोकर भरती संदर्भात लेखी आश्वासन सुद्धा मनसे जिल्हाध्यक्ष नावाने प्राप्त होते. त्याच अनुषंगाने मनसे मार्फत विविध वृत्तपत्र तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून तशा प्रकारची भरती संदर्भात जाहिरात प्रसिद्ध सुद्धा केली होती. परंतु या नोकर भरतीला गोवा राज्यातील विविध विरोधी पक्षांनी स्थानिक व परप्रांतीय मुद्दा उपस्थित करत आक्षेप घेत मुख्यमंत्री गोवा यांना एमआरएफ कंपनीवर दबाव आणत ही भरती रद्द करण्यास भाग पाडले.
त्यामुळे उद्या बॅरिस्टर नाथ पै MIDC येथे मनसे आयोजित नोकर भरती मेळावा रद्द करावा लागत आहे. यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांची होणाऱ्या गैरसोई बद्दल दिलगिरी व्यक्त करत आहोत अशी माहिती जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा