सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ सावंतवाडी शाखेची नूतन महिला कार्यकारिणी जाहीर
सावंतवाडी (प्रतिनिधी) :
सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई महाराष्ट्र शाखा सावंतवाडीची सभा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर, सावंतवाडी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या सभेला तालुक्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच नागरिकांची उपस्थिती लाभली. सभेच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष महेंद्र सावंत होते. या सभेचा मुख्य उद्देश नूतन महिला कार्यकारिणीची नेमणूक आहे. कार्यकारिणीचा कार्यकाळ तीन वर्षांचा असणार असून महिलांच्या पुढाकारातून संघटनेची कामे गावोगावी नेण्याचा निर्धार यावेळी अध्यक्ष महेंद्र सावंत यांनी व्यक्त केला.
निवड प्रक्रियेत एकमुखाने पुढील पदाधिकारी निश्चित करण्यात आले. अध्यक्षा म्हणून आयु. प्रज्ञा टिळाची जाधव (माजगाव), उपाध्यक्षा आयु. समृद्धी सचिन जाधव (चौकुळ), सचिव आयु. अन्विता अभय जाधव (चौकुळ), तर खजिनदार आयु. सान्वी संजोग जाधव (चौकुळ) यांची निवड करण्यात आली. तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून आयु. नीलिमा नारायण आरोंदेकर (माजगाव), आयु. श्रद्धा सुधाकांत जाधव (सातार्डा ), आयु. मयुरी लाडू जाधव (कोलगाव), आयु. सुष्मिता शिवाजी जाधव (आरोंदा), आयु. हर्षना विनायक जाधव (कोलगाव), आयु. रेश्मा ओंकार कासकर (नेमळे), आयु. सौम्या समीर जाधव (चौकुळ), आयु. गोतमी गोविंद जाधव ( माजगाव) यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमास ज्येष्ठ सल्लागार आयु. नारायण आरोंदेकर व आयु. वासुदेव जाधव विशेष उपस्थित होते. त्याचबरोबर मंडळाचे अध्यक्ष महेंद्र सावंत, उपाध्यक्ष अमित जाधव, सचिव टिळाजी जाधव, खजिनदार विनायक जाधव तसेच सदस्य सचिन जाधव, कृष्णा कदम, अभय जाधव, आयु. मीनल जाधव, आयु. सोनल जाधव, आदी मान्यवरांनी उपस्थित राहून नूतन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना ज्येष्ठ सल्लागार आयु. आरोंदेकर यांनी महिला कार्यकारिणीच्या स्थापनेचे महत्व अधोरेखित केले. समाजातील महिलांची भागीदारी वाढली तर संघटना अधिक सक्षम होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच उपस्थित सर्व मान्यवरांनी नूतन कार्यकारिणीच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात प्रभावी कामे घडावीत अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी विनायक जाधव, सचिन जाधव यांनी देखील आपली मनोगते व्यक्त केली.
नूतन कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणातून आगामी तीन वर्षांत संघटनेच्या कार्याचा विस्तार, महिला सक्षमीकरण, युवकांना प्रोत्साहन आणि बौद्ध समाजातील एकता अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला. प्रास्ताविक व स्वागत उपाध्यक्ष अमित जाधव यांनी तर आभार सदस्य संजोग जाधव यांनी व्यक्त केले. सभेचा समारोप एकोपा, प्रबोधन आणि कार्यवृत्तीने करण्याचा निर्धार घेत सर्व सदस्यांनी केला.
______________________________
*संवाद मीडिया*
🏬🏬🏬🏬🏬🏬🏬🏬🏬🏬
*✨ आपल्या स्वप्नातील घर… आता आपल्या गावी!* ✨
मुंबई आणि चिपळूण नंतर मिळालेला जबरदस्त प्रतिसाद… *आता कुडाळमध्ये!*
*DDS BUILDCON प्रस्तुत*
*॥ ज्ञानेश्वरी वास्तुप्रकल्प ॥*
*1 RK | 1 BHK | 2 BHK फ्लॅट्स | दुकानगाळे | ऑफिसेस*
*📍 कुडाळ एस.टी. स्टँडजवळ – प्रमुख लोकेशन!*
*🌳 मनासारखी जागा, विश्वासार्ह बांधकाम, आणि आपल्या मालकीचं हक्काचं घर!*
*🔑 वैशिष्ट्ये – जे आपलं घर खास बनवतील:*
🏢 दोन भव्य इमारती –
▪️ बिल्डिंग नं. 1: दुकानगाळे + पार्किंग + ६ मजले
▪️ बिल्डिंग नं. 2: पार्किंग + ७ मजले
🛡️ भुकंपरोधक सुरक्षित बांधकाम
🎥 प्रत्येक इमारतीसमोर CCTV कॅमेरे
🚗 स्टील्ट पार्किंगमध्ये सौरउर्जेवर लाईट
🚰 २४ तास पाण्याची सोय
🛗 आकर्षक लॉबी व लिफ्टची सुविधा
🌧️ सांडपाणी प्रक्रिया संयंत्र
🚿 अंतर्गत भुयारी गटारे
🎨 पार्किंगमध्ये विशेष रंगीत टायलींग
*📌 साईट आणि ऑफिस लोकेशन*
*कुडाळ एसटी स्टँड समोरील साई छाया व नलावडे हॉटेलच्या मधून चालत दोन मिनिटांच्या अंतरावर,
ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग-
*📞 संपर्क करा आजच!*
*Dnyandev Sawant*
*📲 94056 71177*
*94056 31177*
*88791 81827*
📧 budoonpartner@gmail.com
🌐 www.ddsbuildcon.in
RERA No.: P52900048563
🎉 आपल्या स्वप्नांच्या घराची गुरुकिल्ली आता आपल्या हाती!
*ज्ञानेश्वरी – घर नाही, आत्मियतेचं नातं!*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/182395/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

