दोडामार्ग
भाजप तर्फे आज सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारकडे विकासकामे करण्यास निधी नसल्यामुळे आज दोडामार्ग शहरात भाजप तर्फे ‘भिक मागो आंदोलन’ करण्यात आले.
बांदा ते दोडामार्ग व दोडामार्ग ते विजघर हे मुख्य रस्ते खड्डेमय झाले आहेत, संचारबंदीच्या काळात आलेले वाढिव विज बिल माफ केले नाही. म्हणून भिक मागुन जमलेला पैसा बांधकाम विभाग व विद्युत विभागाला दिला जाईल. महाविकास आघाडी सरकार विकास करु शकत नाही. कारण त्यांच्या कडे निधी नाही. त्यामुळे त्यांना भिक मागुन जमलेला पैसा देण्यात येईल असे भाजपचे एकनाथ नाडकर्णी यांनी सांगितले.
विकास करण्यासाठी लवकरच महाराष्ट्रात भाजपा सरकार येणार असून खा. नारायण राणे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास होणार असल्याचे भाजपचे राजेंद्र म्हापसेकर यांनी सांगितले.
यावेळी संतोष नानचे, संजय विर्नोडकर, हडीकर, पांडुरंग बोर्डेकर, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले आहेत.