*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*दचकून उठतो झोपेतपण*
आवडून गेली तुझी बत्तीशी
वसूल केलेस *शंभर गुण*
हेवा वाटतो *मदनिकेबाई*
दचकून उठतो *झोपेतपण*
//1//
ओठ नशीले डाळींबी लाल
गालावरती दिसतो गुलाल
मागे पाणी म्हणून *गाणी*
सौभाग्य चिन्ह कपाळी लाल
//2//
तलम वस्त्रांतील तू ग राणी
लाखात दिसतेस अती देखणी
नसला पत्ता पाठीवर वेणिचा
मोकळ्या कुंतली दिसतेस हिरकणी
//3//
किती वेळ तू *नदी काठावर*
ताटकळत बसणारअशी एकटी
नाही विश्वास बसत अजुनही
येतही नाही एकही *एस.टी*
//4//
करतेस का ग जाहीरात कोणती
अशक्य नाही *तुजला काही*
गुणी नारी तू गंगा *तीरावर*
पाहीली नाही एकटी *कधीही*
//5//
मारून पाणी पाहिले डोळ्यावर
विश्वास नाही *अजून बसत*
शब्द *शिल्प* तू या नगरीतील
कधीच नाही यावेळी *बघत*
//6//
विनायक जोशी🖋️ ठाणे
मीलनध्वनी/9324324157

