*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*गरळ*
ते भडवेभुंगे मातले साले
जे लाचारांना पोळून प्याले
सर्व सामान्यांना भरडून
स्वतः मस्तवाल मातब्बर झाले
दादागिरी गुंडागर्दी धाक दडपशाही
मुजोरीतच मशगुल राहिले
अत्याचार भ्रष्टाचार कुविचार
हेच आचरण अंगिकारले
जनसामान्यांची पिळवणूक करून
स्वतःचे राजवाडे उभे केले
धर्म जातीपातीच्या पोळ्या शेकून
ठेकेदार झाले साव राहिले
इतरांना दुःखाच्या खाईत लोटून
ऐशोआरामाच्या दरबारात लोळू लागले
संधीसाधू भोंदू पाखंडी
वितंडवादात रमले गमले
साध्याभोळ्या जनतेला लुटून
स्वार्थी आपमतलबी झाले
सत्ता संपत्तीच्या जोरावर
सुशिक्षित संस्कृतीला छळू लागले
ते भडवेभुंगे मातले साले
घुसखोरी करून पोखरू लागले
देशद्रोही अतिरेकी आतंक घडवून
राष्ट्र विभाजून विकायला निघाले
ते भडवे साले विषारी विखारी साप झाले
नको ते नको तिथे गरळ ओकू लागले
कवी:-
चंद्रू

