श्री गणेशा आरोग्याचा” शिबिरात 5 हजार 782 रुग्णांची तपासणी
सिंधुदुर्गनगरी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतुन मुख्यमंत्री सहाय्यता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष सिंधुदुर्ग यांच्या पुढाकाराने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी “श्री गणेशा आरोग्याचा” या सामुदायिक आरोग्य शिबिराला सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद मिळाला. या शिबिरात 5 हजार 782 रुग्णांची तपासणी करण्यात आली असल्याची माहिती सिएमआरएफचे वैद्यकीय अधिकारी यांनी दिली.
जिल्ह्यात एकुण 144 सामुदायिक आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली होती. त्यात 5 हजार 782 रुग्णांनी आरोग्य तपासणी करुन घेतली. या शिबिरात 2 हजार 117 रुग्णांची रक्ताच्या विविध तपासण्या करण्यात आल्या तसेच 611 रुग्णांची ईसीजी करण्यात आली आणि आवश्यकतेनुसार उपचार करण्यात आले. या शिबिरामध्ये गंभीर आजार असलेल्या 154 रुग्णांना पुढील उपचारासाठी इतर रुग्णांलयामध्ये संदर्भीत केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष सिंधुदुर्ग यांच्या पुढाकाराने आणि गणेश मंडळाच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. यात प्रामुख्याने मुख्यमंत्री सहाय्यता निधीशी संलग्र रुग्णांलये, धर्मादाय रुग्णालये, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना संलग्र रुग्णांलये, जिल्हा शल्यचिकित्साकअंतर्गत उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय सार्वजनिक आरोग्य विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्ह्यातील सेवाभावी संस्थानी सक्रिय सहभाग घेतला.
या उपक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे, एमजेपीजेवाय जिल्हा समन्वयक यांचे मार्गदर्शन या उपक्रमाला लाभले आहे.
शिबिराची आकडेवारी
एकुण शिबिरे :- 144
एकुण रुग्णंसंख्या:-5782
प्रौढ रुग्ण:- 5341
बाल रुग्ण :-441
रक्त तपासणी :-2217
ईसीजी :-611
