You are currently viewing मालवण समुद्रात अनधिकृत मासेमारीवर धडक:

मालवण समुद्रात अनधिकृत मासेमारीवर धडक:

मालवण समुद्रात अनधिकृत मासेमारीवर धडक: रत्नागिरीच्या तीन पर्ससीन नौका जप्त

मालवण

मालवण समुद्रात अंदाजे ६ ते ७ सागरी मैल आत रत्नागिरी येथील तीन अनधिकृत पर्ससीन नौका मासेमारी करताना पकडण्यात आल्या. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

८ सप्टेंबर रोजी सायंकाळी मालवण मत्स्य विभागाचे अंमलबजावणी अधिकारी गणेश टेमकर व त्यांच्या पथकाने नियमित गस्तीदरम्यान ही नौका पकडली. पकडण्यात आलेल्या नौकांमध्ये सफा मारवा ३ (IND-MH-४-MM-५२६२), राबिया अब्दुल लतिफ (IND-MH-४-MM-५२००) आणि जलसफा २ (IND-MH-४-MM-६००५) यांचा समावेश आहे. या नौकांवर एकूण ५५ ते ६५ खलाशी उपस्थित होते.

सदर नौका जप्त करून आनंदवाडी, देवगड बंदरात ठेवण्यात आल्या असून, त्यावरील मासळीचा लिलाव ९ सप्टेंबर रोजी सकाळी करण्यात येत आहे. या नौकांना लाखों रुपयांचा दंड होण्याची शक्यता आहे.

ही कारवाई मालवण पोलिस स्टेशन, सागरी सुरक्षा विभाग आणि मत्स्य व्यवसाय विभाग यांच्या संयुक्त सहकार्याने करण्यात आली. प्रकरणी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे, अशी माहिती मत्स्य विभागाने दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा