*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी वि ग सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मंगल पडघम*
〰️〰️〰️〰️
शब्दाशब्दातुनी तूं
हृदयी पाझरणारी
तूं एक स्मृतीमंजूषा
अंतरा कुरवळणारी
तु हवासा गंधचंदनी
सुखविणारा अंतरी
स्वर तुझा लडिवाळी
घुमणारी जणू पावरी
चराचरात भास तुझा
जणू चैतन्याच्या सरी
सर्वत्री मंगल पडघम
हृदयी गीतार्थी माधुरी
〰️〰️〰️〰️〰️〰️
***** *विगसा* *****

