*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कित्येकदा*
हे जिंदगी तुझ्या पुढे नाही काही चालले
कित्येकदा जिंकता जिंकता हरलो मी
संकटांशी दोन हात करत लढत राहिलो
कित्येकदा हरता हरता जिंकलो मी
हसत खेळत सुखदुःखे पचविले
कित्येकदा रडत पडत शिकलो मी
दूर लोटले मला आपल्यांनीच तेंव्हा
कित्येकदा जिंदगीची व्यथा मांडत आलो मी
जीवन जगताना जिंकण्या हरण्याचा हा खेळ
कित्येकदा चिकाटीने खेळत जगलो मी
कवी:-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर, धुळे.*
७५८८३१८५४३.
८२०८६६७४७७.

