You are currently viewing शिवसेना कणकवली तालुका नवरात्रोत्सव समितीच्या अध्यक्षपदी विलास गुडेकर

शिवसेना कणकवली तालुका नवरात्रोत्सव समितीच्या अध्यक्षपदी विलास गुडेकर

*खजिनदार पदी महेश कोदे यांची निवड*

कणकवली :

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे कणकवली तालुका आयोजित नवरात्रोत्सव दिनांक २२ सप्टेंबर २०२५ ते दिनांक ३ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत संपन्न होणार आहे. विजय भवन कणकवली येथे मा.आ. वैभव नाईक, जिल्हा प्रमुख संदेश पारकर, मा.आ. परशुराम उपरकर, मा आ.राजन तेली, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत उत्सव समितीच्या अध्यक्षपदी विलास गुडेकर तर खजिनदार पदी महेश कोदे यांची निवड करण्यात आली.

या बैठकीला मा.उपजिल्हाप्रमुख व जेष्ठ शिवसैनिक राजू शेट्ये, उपजिल्हाप्रमुख बंडू ठाकूर, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, उपतालुकाप्रमुख राजू राणे, धीरज मेस्त्री, सिद्धेश राणे, अवि सावंत, युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, संजय रावले, अरुण परब व शिवसैनिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा