You are currently viewing बाप्पा निघाले घरी आपल्या

बाप्पा निघाले घरी आपल्या

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*बाप्पा निघाले घरी आपल्या*

 

बसले येऊन पाटावर

घेऊन हातात शिदोरी

प्रवास असून लांबचा

वाटेत खायची सोय बरी

//1//

जलद खाताना मोदक

ढेकर आली कानावर

हसू दिसता *तोंडावर*

बाप्पा आले *भानावर*

//2//

उंदीर गेला *ओशाळून*

धांदरटपणा बाप्पाचा पाहून

राहून राहून आश्चर्य वाटते

दहीपोहे घेतलेन *मागून*

//3//

स्वर्गाचा तो प्रवास भारी

त्यातून आज लाल बावटा

ढगांची टक्कर जोरदार

अवघड आहे मिळणे वाटा

//4//

घाबरून वळता *बोबडी*

अंगावर घेत ढगांची गोधडी

पोहोचले मुक्कामी बाप्पा

रोहिणी हंसते मिश्कील थोडी

//5//

कृतकृत्य पावली वाचून मेसेज

संपली म्हणून *जबाबदारी*

ऐकून शंभुचा *शंख नाद*

खुशीत गेली *झोपून स्वारी*

//6//

 

विनायक जोशी 🖋️ठाणे

मीलनध्वनी/9324324157

प्रतिक्रिया व्यक्त करा