You are currently viewing कॅमेर्‍यासोबतच..माझं जगणं..!!

कॅमेर्‍यासोबतच..माझं जगणं..!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कॅमेर्‍यासोबतच..माझं जगणं..!!*

 

सेंकड इनिंगच्या बॅटींगला

आरश्यात…..बघायचं नसतं

दिव्यत्वाची प्रचिती येण्यासाठी

कॅमेर्‍यातून ..बघायचं असतं..

 

स्वतःवर …..प्रेम करा…

कॅमेरा..माझा.. रोजचं सांगतो

कथाकथनातील शोध परिक्रमा

माझा..स्टेट्स करायला लावतो

 

मातृगर्भातले भावस्पर्शी स्पंदन

जन्मापूर्वीचं कॅमेरा मांडतो

घराला घरपणं… आईचं

कॅमेरा भींतीवरून सांगतो..

 

चलते- चलते यह फोटोज

हमेशा ….याद रखना

धरेवरची..हीचं शेवटची खूण

कभी अलविदा..ना कहना..

 

आपलं स्मारक प्रतिबिंबातून

इथेच …सोडून जा

मातीत राख होण्यापेक्षा

अवयव..इथेच देऊन जा..

 

बाबा ठाकूर

प्रतिक्रिया व्यक्त करा