You are currently viewing चैतन्याचा झरा

चैतन्याचा झरा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या कवयित्री सौ.आदिती मसुरकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*चैतन्याचा झरा*

 

उत्साहाचा चैतन्याचा

झुळझुळणारा झरा तुम्ही

सुगंधीत शुभेच्छांचा

वर्षाव करतोआजआम्ही

 

कर्तव्याचा महामेरू

तुम्ही सहजतेने झेललात

आदर्श शिक्षिकेचा ठसा

माझ्या मनावर उमटवलात

 

आंतरिक गुण ओळखून

मला प्रेरीत केलात

मोठी बहीण बनून

कौतुकाची थाप दिलात

 

सुखदायी तेजकिरणांनी

जीवन तुमचे उजळू दे

सुखशांतीच्या श्रावणसरी

अंगणी तुमच्या बरसू दे

 

हास्यरूपी गुलाब पुष्पे

मुखावर सदा फुलू दे

सुवास त्या सुमनांचा

चोहीकडे दरवळू दे

 

अनमोल त्याआठवणी

जीवनात सोबत करतील

जुळलेले मैत्रीचेबंध

हृदयात घट्ट राहतील

 

*नवीन जीवनप्रवासाठी सुगंधीत चाफ्यासम शुभेच्छा🌹🌹*

 

*✒️ @सौ. आदिती धोंडी मसुरकर*

*कुडाळ सिंधुदुर्ग*

प्रतिक्रिया व्यक्त करा