You are currently viewing पाहुणा आहे इथे प्रत्येकजण बाप्पासारखा

पाहुणा आहे इथे प्रत्येकजण बाप्पासारखा

पाहुणा आहे इथे प्रत्येकजण बाप्पासारखा

काही दिवसांचा
कोणी दीड, कोणी पाचतर कोणी दहा दिवसांचा..

थोडा वेळ आहोत इथे
तर थोड जगुन घेऊया
बाप्पा सारखे थोडे
लाडु मोदक खाऊन घेऊया…

इथे सर्वच आहेत भक्त आणि
सगळ्यांमध्ये आहे बाप्पा
थोडा वेळ घालवू सोबत
आणि मारु थोड्या गप्पा…

मनामनातले भेद मिटतील
मिटतील सारे वाद
एक होईल माणुस
आणि साधेल सुसंवाद…

जातील निघुन सारेच
कधी ना कधी अनंताच्या प्रवासाला
ना चुकेल हा फेरा
जन्माला आलेल्या कोणाला…

बाप्पा सारखं नाचत यायचे
आणि लळा लावुन जायचे
दहा दिवसांचे पाहूणे आपण
असे समजून जगायचे…

किंमत तुमची असेलही
तुमच्या प्रियजनांना लाख
आठवणी ठेवतील जवळ
अन् विसर्जित करतील तुमची राख…

पाहुणा आहे ईथे प्रत्येकजण
दीड दिवस अन् दहा दिवसाचा
हे जगणे म्हणजे एक उत्सव
हा काळ दोन घडींच्या सहवासाचा……….. 🙏श्री स्वामी समर्थ🙏संग्रह
*संग्रह©अजित नाडकर्णी,संवाद मिडीया*

प्रतिक्रिया व्यक्त करा