You are currently viewing क्षण निरोपाचा

क्षण निरोपाचा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*क्षण निरोपाचा*

 

संपली लगबग सरली आतुरता,

आले आले म्हणता निघाले विघ्नहर्ता.

सजावट रोषणाई मखर,

फिकी झाली बाप्पा निघाल्यावर.

मांगल्य घेऊन आलेला लाडका मोरया,

हळवं करून निघाला जावया.

झाली आरती संपली मंत्रपुष्पांजली,

वातावरणात अस्वस्थता भरली.

निरोप घेतो आता आज्ञा असावी,

म्हणतानाच डोळे आले भरून,

बाप्पा गेला धूसर धूसर होऊन.

दहीभात कानवला शिदोरी बांधली,

सौख्यासाठी सर्वांच्या मागणी केली.

जड झाले मन अन् अंत:करण,

हळवाच हा आला निरोपाचा क्षण.

घुमली आरोळी बाप्पा मोरयाची,

विनवणी झाली पुढच्यावर्षी लौकर येण्याची.

एकवार घराकडे ममतेने पाहिले,

भरभरून आशीर्वाद देत बाप्पा पाठमोरे झाले.

नदी किनारी निरोपाची आरती,

थरथरले निरांजन अन् पाऊले अडखळती.

प रत या म्हणत एक दोन तीनदा दिसले,

क्षणभरात हात पाटासह रिकामे आले.

सारे कसे शांत शांत ,

सारे कसे सुन्न सुन्न रिते.

 

अनुराधा जोशी.

अंधेरी मुं. 69

9820023605

प्रतिक्रिया व्यक्त करा