You are currently viewing मैत्री…

मैत्री…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मैत्री……*

 

शब्दांनी घडवली मैत्री

साहित्यात समान आवडीने

कुठे तुम्ही अन् मीही कुठे

मैत्र जुळले मनाने!!१

 

विशुद्ध असावी मैत्री

नकोच मनात गाळ

अलगद निसटत्या मोत्यांची

सुंदर ओवावी माळ!!२

 

रुंजी घालतं बालपण

गोड आठवणींसह मनांत

कुठे हरवला वाटून खायचा

तो”चिमणीचा दांत””!!३

 

मैत्री ची सरीता वाहते

खळखळती दुथडी भरून

निर्मळ अंतःकरणाने

जावे त्यात सामावून!!४

 

मैत्री म्हणजे असते

जाळीचे पिंपळ पान

आठवणीत मिळवतं

काळजापाशी स्थान!!५

 

मैत्रीचं सुगंधी फूल

जपावं सदैव आदराने

सुखदःखात देते साथ

तेच निखळ प्रेमाने!!

 

न बोलता सारं कळतं

दृष्टीत आश्वासक भाव

इथेच तर गवसते ना

मैत्रीचे सुंदर गांव!!

 

अरुणा दुद्दलवार

दिग्रस यवतमाळ

प्रतिक्रिया व्यक्त करा