You are currently viewing खि रा प त

खि रा प त

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*खि रा प त*

 

 

चाखून गोडी खिरापतिची

बाप्पा परतले *माघारी*

प्रसादाचे *प्रकार पाहून*

शिक्षा भोगली *अघोरी*…….1

 

किती करावे कौतुक बप्पाचे

खाऊ घातले मोदक फार

डोळे दिपले *दुखू* लागले

सहन न झाला लेझर मार……2

 

ध्वनिमुद्रण *यंत्रे* बिघडली

फुटले तर कित्येकांचे कान

वादन ऐकून *ढोल ताशांचे*

गाठले कित्येकांनी “स्मशान”…3

 

बाप्पा सुध्दा वाटला कष्टी

ताकीद देऊन निघून गेला

असाच जर का गोंगाट कराल

येणार नाही मी पुढील वर्षाला…4

 

दुर्वा शमी पुरे म्हणाला

नकोय लाच *प्रसादाची*

भेसळयुक्त काजू-बर्फीची

आफत येते पोट दुखिची………5

 

गोडावरती बसून माशा

हैराण करती दहा दिवस

शिक्षा हौसेची अती होते

बसून आता *रात्रंदिवस*……..6

 

कान किटले ऐकून भजने

नाही कसला *विरंगुळा*

पाहून पाहून दुखले *डोळे*

कोटी कोटीचा पैसा काळा……7

 

विनायक जोशी 🖋️ठाणे

मीलनध्वनी/9324324157

प्रतिक्रिया व्यक्त करा