You are currently viewing शिक्षक दिन

शिक्षक दिन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*शिक्षक दिन*

 

( साऱ्या गुरुवर्यांना वंदन करून )

 

हातात छडी

सफेद डस्टर

मळकं धोरत

आमचे मास्तर

 

घाई घाईने

वर्गात येत

सारा वर्ग

ताब्यात घेत

 

इतिहास,गणित

भाषा, विज्ञान

सारे असे

तयार ज्ञान

 

कडक शिस्तीचे

खूप भासत

तरी डोळे

स्नेहाळ दिसत

 

छडी मारत

आमच्या हातात

पाणी दिसें

त्यांच्या डोळ्यात

 

बाई सुद्धा

शिकवत मुलांना

जसे जोपसात

अलगद फुलांना

 

ध्येयाने पेशा

पत्करला ज्यांनी

पिढ्या आमच्या

घडवल्या त्यानीं

 

शिक्षक दिनी

त्यांना आठवतो

कृतज्ञतेने

वंदन करतो

 

श्रीनिवास गडकरी

रोहा पेण पुणे

9130861304

@ सर्व हक्क सुरक्षित

नावासहितच पुढे पाठवावे

05.09.2025

प्रतिक्रिया व्यक्त करा