You are currently viewing शिक्षक दिन

शिक्षक दिन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

🌹 *शिक्षक दिन* 

 

विरून गेला शब्द गुरुजी

बोला आता सरजी

निघुन गेला जुना वारसा

सर, शब्दाचा नवा आरसा

 

गुरुजी शब्दात होता आदर

सगळ्यांवरती करडी नजर

आता न उरला तोचि काळ

गुरुजी म्हणता ठरे गावंढळ

 

शिस्तीचे तर भानच नाही

शिक्षेला मज्जावच नाही

जर का गुरुजी शिक्षा देती

शासन बसते त्यांच्या माथी

 

गुरुकुलात जेव्हा मिळतसे शिक्षा

मान झुकवुनी घेती शिषया

छडी लागे छम छमचा

जयघोष हा असे विदयेचा

 

गुरुजीतला आपलेपणा

नाही उरला जनमाणसा

सर, शब्दाच्या उदोउदोने

उजळल्या दाहीदिशा

 

इंगजांनी नेली संस्कृती

सर, शब्दाला दिली गती

इंग्रजी भाषा रुपी भूत

लावून गेले आपल्या माथी

 

गुरुजी, शब्द विरून गेला

संस्कृतीचा धागाच तुटला

नव्या पिढीची नवीन छाया

सगळेच आता स्वीकारुया

 

*श्रीम. शिला पाटील. चांदवड.*

प्रतिक्रिया व्यक्त करा