You are currently viewing शिक्षक दिन🌹 5 सप्टेंबर

शिक्षक दिन🌹 5 सप्टेंबर

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम लेख*

 

*शिक्षक दिन🌹 5 सप्टेंबर* 

 

*गुरु ब्रम्हा गुरु विष्णु*

*गुरूदेवो महेश्वरा*

*गुरुसाक्षात परब्रम्ह*

*तस्मै:श्री गुरवे नमः—–*

 

माणसाची पहिली गुरु त्याची जन्मदात्री आई असते. त्यानंतर शाळेतील गुरु. ज्यांच्याकडून आयुष्याची जडणघडण शिकायची असते हातात हात घेउन अ आ इ ई ज्या गुरुने मला शिकवले. त्यांना आज माझे प्रथम नमन.

कारण, आईला सोडून बाळ पहिली पायरी चढते. ती पायरी प्राथमिक शाळेची असते. अंगणवाडीत ते आईबरोबरच असतात संस्कार आणि बालपणाचे बाळकडू पिऊन प्राथमिक शाळेत येते.

” नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा”

गुरु बिना ग्यान नही हे मी शाळेत आल्यावरच शिकले. दररोज होणाऱ्या, प्रार्थने पासून रामरक्षा गणपती स्तोत्र. चाली नुसार कविता गायन मी गुरूकडून शिकले. ते माझे आचारी सर.

आज ते हयात नाही. पण नकळत त्यांच्या चरणी मस्तक माझे नमले.

सोज्वळ प्रसन्न चेहरा निखळ वाणी, रुबाबदार पेहराव आणि फणसासारखे वरून काटेरी असले तरी, आतून मऊ गऱ्या सारखे असणाऱ्या माझा गुरूंचा स्वभाव, साधी राहणी, उच्च विचारसरणी चे माझे गुरु आणि माझी गुरुमाय.

कधीही त्यांच्या घरी गेलो की, सारवलेलं अंगण, रेखाटलेली रांगोळी, आणि तुळशी वृंदावन, बाजूला पारिजातकाचं झाड, आणि फुलझाडांची छोटीशी बाग. एवढ पाहून मन कस प्रसन्न व्हायचं. वाटायचं इथं सुंदर विठ्ठल-रखुमाईचे मंदिर आहे.

घरात गेल्यावर, प्रसन्न मुद्रेने गुरूंनी मला म्हणावं, “ये घरात काय काम काढलेस? बस समोर. आणि आत बाईंना निरोप द्यायचे, “अगं, वाटीत सातूच पीठ आण” सातूचं पीठ कालवून किती गोड लागायचं !म्हणून सांगू. वाटायचं काय सेवा करू यांची.? सात जन्म घेऊन घ्या गुरूंचा सेवेत रहावस वाटतं!

*आज हायस्कूल, कॉलेजात,* *प्रोग्राम होतात. पार्ट्या* *होतात कोणी राजकीय नेता* *येतो. कोणी सिने अभिनेता* *येतो. उद्घाटनाला गावात* *अनेक नवनवीन कार्यक्रम* *होतात. त्यांचे मोठाले* *फोटो झळकतात रस्त्यावर.* *आम्हाला संस्कार आदर भाव, सेवा* *शिकवणाऱ्या माझ्या प्रेमाळ* *गुरूंची कोणाला आठवण* *येत नाही. उलट गुरुजी* *असे, गुरुजी तसे, म्हणून* *हेटाळणी केली जाते. याचे* *मला खूप वाईट वाटते. खरी* *पिढी घडवणारा तो एक* *शिल्पकार आहे त्या गुरूंना कायमचा* *दुय्यम स्थान का दिले* *जाते? एका ठिकाणी तर अध्यक्ष* *स्थानी अधिकारी झालेला विध्यार्थी* *बसलेला आणि त्या* *कार्यक्रमाचे सूत्र संचलन करणारा* *त्याचे गुरु स्टेजच्या खाली* ते *बघुन मी निशब्द* *झाले.आणि ही गोष्ट विशेष म्हणजे* *कोणाच्या लक्षातही आली* *नाही. आपल्या हातात हात* *घेवुन अक्षराला वळण देणारा* *गुरु आपण विसरून कसा* *चालेल* ?

*एखाद्या कार्यक्रमाच्या उदघाट्नला* *गुरुजी नसतो त्याने* *घडविलेला एखादा अधिकारी असतो.*

माझ्या गुरूंनी दिलेला संस्काराचा, आदर्शाचा वारसा आम्ही कायम चालवू. मागील वर्षी मला माझे गुरु बाजारात भेटले, मी भर बाजारात त्यांच्या पाया पडले. त्यांनी विचारले “काय करतेस”? मी अभिमानाने सांगितलं “गुरुजी तुमच्याच पावलावर पाऊल ठेवले मी. सार्थ अभिमान वाटला माझ्या गुरूंना माझा.त्यांची मी शिष्य आहे. याचा अभिमान वाटतो. मी घरातही माझ्या गुरूंचा महिमा सांगते.

“गुरूने दिला ज्ञानरुपी वसा,

आम्ही चालवू हा, पुढे वारसा!

 

*शीला पाटील. चांदवड*

प्रतिक्रिया व्यक्त करा