You are currently viewing वेंगुर्लेत भाजपाच्यावतीने वारकरी संप्रदायातील मंडळींना भजन साहित्याचे वाटप

वेंगुर्लेत भाजपाच्यावतीने वारकरी संप्रदायातील मंडळींना भजन साहित्याचे वाटप

*वेंगुर्लेत भाजपाच्यावतीने वारकरी संप्रदायातील मंडळींना भजन साहित्याचे वाटप*

*परिवर्तिनी एकादशीचे औचित्य साधुन मृदुंग व टाळ भेट देऊन अध्यात्मिक सेवेची सलगी*

. वेंगुर्ले येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने वारकरी संप्रदायातील भक्तांना भजनासाठी आवश्यक असणारे साहित्य भेट देण्यात आले. यामध्ये मृदुंग आणि टाळ यांचा समावेश होता. या उपक्रमामुळे वारकरी मंडळींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

भाजपाच्या लोकसहभागातून आयोजित या उपक्रमात अनेक वारकरी उपस्थित होते. भजन व कीर्तनाच्या माध्यमातून अध्यात्मिक जागृती घडविणाऱ्या मंडळींना आवश्यक ते साहित्य पुरवून भाजपा वेंगुर्ले विभागाने सामाजिक आणि धार्मिक सेवेचा आदर्श उभा केला आहे.
यावेळी भाजपा सिंधुदुर्ग उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई आणि जि. का.का.सदस्य सुहास गवंडळकर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन करताना भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची प्रमुख भूमिका होती. उपस्थित वारकऱ्यांनी भाजपाच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक ह.भ.प.सावळाराम कुर्ले बुवांनी केले व आभार व्यक्त केले.
यावेळी किशोर रेवंणकर , गोविंद परब , दाजी सावंत , अंकुश वराडकर , लता खोबरेकर , प्रमीला टांककर , रजनी वराडकर , शकुंतला कुर्ले , लक्ष्मी तांडेल , जोस्ना कुबल , गुणवंती परब , चंदना कुर्ले , सुप्रीया बांदेकर , दुर्वा कुबल , महेंद्र पालव , लता मसुरकर , केसरी खवणेकर , सहदेव गिरप , सुजाता कुर्ले , विठ्ठल वेंगुर्लेकर, श्रीमती मयेकर , सौ. तांडेल , सौ.गिरप इत्यादी उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा