You are currently viewing गौराई (ज्येष्ठा कानिष्ठा)

गौराई (ज्येष्ठा कानिष्ठा)

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*गौराई* (ज्येष्ठा कानिष्ठा)

 

सोन्याच्या पावलांनी

गौराई आली घरात

पंचामृताने पाय पुजन्या

देवघरातील परात

 

धनधान्य पावलांनी

गौरी ओलांडे उंबरा

ज्येष्ठा कनिष्ठा संगती

सण करु या साजरा

 

हळदी कुंकवाच्या पाऊली

आल्या गौराई साजिरी

चैतन्याचं घरदार

भरल्या मोलाच्या तिजोरी

 

तेलाचे दिवे चारी दिशेला

पाटावरती गडू नवा

शालू हिरवा अंगावरती

बाजुस ठेवा खण हिरवा

 

थाळी झांजरी वाजवूनी

गजर करू आईचा

पुरणा वरणाचा नैवेद्य

पान विडा नागिलीचा

 

आल्या लेकी माहेराला

नाही कसलेच उणे

लेक जाई सासरला

होई माहेर सूनेसुने

 

*शीला पाटील. चांदवड.*

प्रतिक्रिया व्यक्त करा