ओरोस येथील आयटीआयमध्ये रिक्त पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी
पद्मश्री रमाकांत आचरेकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ओरोस येथे रिक्त असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक तसेच गणित व चित्रकला निदेशक या रिक्त असलेल्या निदेशक पदांवर तात्पुरत्या स्वरुपात तासिका तत्वावर निदेशक भरण्यात येणार असल्याची माहिती शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्राचार्य ए.एस. मोहारे यांनी दिली आहे.
रिक्त पदे व आवश्यक शैक्षणिक अर्हता शासनाच्या महास्वयंम पोर्टल देण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवारांनी महास्वयंम पोर्टलवर अर्ज करावेत किंवा पद्मश्री रमाकांत आचरेकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ओरोस येथे दि. 10 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यत टपालाने किंवा हस्तदेय सादर करावेत. अधिक माहिती दूरध्वनी क्र. 02362 295808 अथवा भ्रमणध्वनी क्रमांक 9422596034 वर संपर्क साधावा.
