You are currently viewing चतुर्थी

चतुर्थी

चतुर्थी

गावोगावी
घरोघरी
श्रीगणेशाची
आलीय स्वारी

मनोमनी
कानोकानी
चर्चा रंगे
चतुर्थीची

चाकरमान्यांचे
लोंढेच्या लोंढे
लोटलेत गावी
भक्तीभावाने

आनंदाचे
चैतन्याचे
आले भरते
सर्वत्र सारे

मूर्तीकारांचे
कलाकारांचे
कौतुक होई
भजनीबुवांचे

आरत्या गाती
तन्मयतेने
पूजा करती
समरसतेने

आबालवृद्ध
भक्तगण सारे
भक्तीत रमती
बेभानपणे

बा गणेशा
बुद्धी दे सा-यांना
कृपा तुझी लाभू दे
सकल सर्वांना

सुरेश बिले
*संग्रह अजित नाडकर्णी,शुभांजीत श्रृष्टी*

प्रतिक्रिया व्यक्त करा