वेंगुर्ला :
भाजपाचे युवा नेते विशाल परब यांनी रेडी गावतळेवाडी आणि गोलतुवाडी येथील घरोगरी जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले. तसेच ग्रामस्थांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी रेडी गावाचे सरपंच रामसिंग राणे, सागर राणे, संदीश राणे, परशुराम राणे, जयेश राणे, रविंद्र राणे, दिलीप राणे आणि किरण राणे आदी मान्यवर उपस्थित होते.
विशाल परब यांनी गणपती दर्शनानंतर गावकऱ्यांशी संवाद साधला. गावकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले. विशेष म्हणजे गावातील ज्येष्ठ नागरिकांचीही त्यांनी भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.
यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. ग्रामस्थांनीही परब यांच्या उपक्रमाचे स्वागत करून त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधला.

