सिंधुदुर्गनगरी :
भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाने (Ministry of Labour & Employment) गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांसाठी ई-श्रम पोर्टलवर नोंदणीसाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. नोंदणी करून घेण्यासाठी पात्र गिग कामगारांनी http://register.eshram.gov.in/#/user/self या अधिकृत लिंकवर जाऊन त्वरित नोंदणी करावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी रविराज कदम यांनी केले आहे.
भारतातील Plateform Worker यांना सामाजिक संरक्षण देण्याचे गरज ओळखून सामाजिक सुरक्षा कवच आयुष्यमान भारत अंतर्गत केंद्रीय अर्थसंकल्पीय तरतुदीची अंमलबजावणी करण्यासाठी तसेच सुरक्षा लाभ मिळवण्यासाठी आपल्या विभागातील Plateform Worker ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन सरकारी कामगार अधिकारी यांनी केले आहे.
गेल्या काही वर्षांत प्लॅटफॉर्म इकोनॉमी भारतात आणि जागतिक स्तरावर रोजगार निर्मितीचे एक मोठे साधन बनले आहे. लाखो गिग कामगार या क्षेत्रात कार्यरत आहेत आणि त्यामुळे त्यांना सुरक्षित भविष्यासाठी सरकारी योजनांचा लाभ मिळावा म्हणून केंद्र शासनामार्फत गिग कामगारांच्या नोंदणीचा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे.
ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केलेल्या गिग कामगारांना विविध सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ देण्याचे प्रस्तावित आहे. यामुळे झोमॅटो, स्वीगी, ओला, उबेर यांसारख्या प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या डिलिव्हरी बॉय, राइडर, ड्रायव्हर आणि इतर गिग कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

