You are currently viewing बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या चाकरमन्याला सामाजिक बांधिलकीच्या सदस्यांनी सुखरूप घरी पोहोचवले

बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या चाकरमन्याला सामाजिक बांधिलकीच्या सदस्यांनी सुखरूप घरी पोहोचवले

बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या चाकरमन्याला सामाजिक बांधिलकीच्या सदस्यांनी सुखरूप घरी पोहोचवले

सावंतवाडी (प्रतिनिधी) –

कुडाळ तालुक्यातील घोडगे सोनवडे गावातील व मुंबईत कामानिमित्त वास्तव्यास असलेला 25 वर्षीय चाकरमणी सुशांत घाडीगावकर हा गणपती निमित्त गावी आला होता. रविवारी तो काही खरेदीसाठी सावंतवाडी बाजारपेठेमध्ये आला असता अचानक सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास त्याला चक्कर येऊन तो रस्त्यावर बेशुद्ध पडला.

ही घटना सामाजिक कार्यकर्त्या माया सरचिटणीस यांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांना माहिती दिली. रवी जाधव व लक्ष्मण कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली व वाहतूक शाखेतील पोलीस प्रशांत आरोलकर यांच्याशी संपर्क केला. पोलिसांनी तत्परतेने माजी जिल्हा परिषद सदस्य व माजी सरपंच लॉरेन्स मान्यकर यांच्याशी संपर्क साधून संबंधित युवकाचा पत्ता मिळवला.

त्यानंतर सुशांत घाडीगावकर याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आणि त्याला सावंतवाडीहून जवळपास 70 किमी अंतरावरील घोडगे सोनवडे गावात सुरक्षितपणे पोहोचवण्यात आले. या संपूर्ण मदतीसाठी प्रशांत आरोलकर, लॉरेन्स मान्यकर, तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी रवी जाधव व लक्ष्मण कदम यांच्या सामाजिक बांधिलकीच्या कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले.

सदर घटना ही मानवतेचा व सामाजिक बांधिलकीचा उत्कृष्ट प्रत्यय देणारी असून, या कार्यामुळे संकटकाळात मदतीला धावणारी माणसं आजही आपल्या सभोवताल आहेत, हे अधोरेखित होते.

_____________________________
*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*प्रवेश!!प्रवेश!!प्रवेश!!*

संजिवनी नर्सिंग कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२५-२६*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
२ रा मजला,वांगडे शॅापिंग कॅाम्प्लेक्स,बहादुरशेख नाका,चिपळूण,

संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज,
मंदार कॅम्पस, पेढांबे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी

या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२५/२६* करिता

*GNM* Nursing -3 Years -12th
(महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मान्यताप्राप्त)
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*
या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.

वैशिष्ट्ये-ः
– अत्याधुनिक प्रयोगशाळा
– ⁠उच्चशिक्षित प्राध्यापक
– ⁠हवेशीर वर्गखोल्या
– ⁠परदेशी नोकरीसाठी मुलाखत परिक्षा तयारी
– ⁠१००% नोकरीची हमी
– ⁠उज्वल परंपरा लाभलेले कोकणातील एकमेव पॅरामेडीकल कॅालेज

🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.

*संपर्क फोन नंबर*
+91 721-8850223,
+91 721-8850220,
*📲7276850220,

www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…
*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/170641/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा