सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठाने लिटिल सिस्टर्स ऑफ द पुअर वृद्ध आश्रमाला 12 हजार रुपयाच्या रुग्णपयोगी वस्तू दिल्या.
सावंतवाडी
अनाथाचा आधार बनणे हीच खरी ईश्वर सेवा आहे हीच शिकवण घेऊन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान समाजामध्ये आपले सेवाभावी काम निस्वार्थी व प्रामाणिकपणे करत आहे.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आश्रमांना भेट देऊन आश्रमातील निराधारांना एखाद्या गोष्टीची कमतरता भासल्यास ती गोष्टी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून तत्काळ पुरवली जाते.
सावंतवाडी तालुक्यातील निरवडे सिल्वर एकर येथील लिटिल सिस्टर ऑफ द पुअर या वृद्धाश्रम चालवत असणाऱ्या सिस्टर अनिता रोस यांनी रूपा गौंडर (मुद्राळे) व रवी जाधव यांच्याजवळ काही रुग्णपयोगी वस्तू त्यामध्ये डायफर, डेटॉल तसेच रूम क्लिनिंग च्या वस्तू यांची मागणी केली होती त्यांच्या मागणीनुसार डायपर, डेटॉल, तसेच रूम क्लिनिंग अशा 12 हजार रुपयांच्या वस्तू संस्थेकडून देण्यात आल्या.
या वृद्ध आश्रमात वृद्ध महिला व पुरुष वय वर्ष 75-80 च्या आसपास आहेत. त्यातील एका वृद्ध महिलेच्या डोळ्याचं सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून डॉक्टर तळेगावकर यांच्या मदतीने विनामूल्य ऑपरेशन करण्यात आलं होतं.
या सर्व निराधार वृद्धांना सदर आश्रमामध्ये विनामूल्य सेवा दिली जाते. त्यांची काळजी घेतली जाते. यातील पाच ते सहा निराधार वृद्ध महिला व पुरुष यांना चालता देखील येत नाही अशांना आधार देण्याचं काम काळजीपूर्वक येथील सिस्टर करत आहे. त्यांची देखभाल त्यांना औषध पाणी व दररोज दोन ते तीन वेळा त्यांचे डायपर बदलावे लागतात त्यामुळे डायपर होणारा खर्च या निराधारांना सेवा देणाऱ्या सिस्टरांना परवडण्यासारखा नसतो.
या अगोदर सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून सदर आश्रमाला जीवनावश्यक वस्तू देतेवेळी सिस्टर यांनी डायपरची व विविध वस्तूंची मागणी केली होती त्यानुसार त्यांना आज जवळपास 12 हजार रुपये किमतीच्या वस्तू देण्यात आल्या.
यासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सदस्या रूपा गौंडर( मुद्राळे) शरदीनी बागवे, लक्ष्मण कदम व रवी जाधव यांनी पुढाकार घेऊन सदरच्या वस्तू आश्रमाला दान केल्या.
आश्रमच्या सिस्टर अनिता रोस यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या या सेवाभावी कार्याचे कौतुक करून उपस्थित सदस्यांचे आभार मानले.

