*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या लेखिका कवयित्री सौ.स्नेहा नारिंगणेकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*संकेतस्थळ*
प्रेम संकेतस्थळ म्हणजे
मूक भावनांचा अर्थ लावणे
अंध डोळ्यांवर पट्टी बांधूनी
भुलभुलय्या मध्ये चालणे.. 1
कधी रुसव्या फुगव्या सोबत
विरहात दडली सारी व्यथा
स्पर्शाने खोलले गुज प्रेमाचे
दोन आत्म्यांची ही प्रेमगाथा. 2
जीवनी फुलते स्वप्न अनोखे
काठावर आठवणी साचती
अश्रू बनुनी ओघळताना
अबोल शब्द मिठीत हसती…3
अंतरी लपलेले प्रेमभाव
पापण्या आडून लाजती
चुंबूनी प्राषिता अधराना
उमलुनी गालावर सजती..4
बकुळफुले प्रीतीत बहरली
फुले गंधात भावनांची कळी
माळेत गुंफली स्वप्ने सारी
प्रेमपडसाद संकेतस्थळी..5
सौ. स्नेहा धोंडू नारिंगणेकर .
शिरोडा सिंधुदुर्ग
