You are currently viewing आगग्रस्त शोरूमची आमदार दीपक केसरकर यांनी केली पाहणी

आगग्रस्त शोरूमची आमदार दीपक केसरकर यांनी केली पाहणी

आगग्रस्त शोरूमची आमदार दीपक केसरकर यांनी केली पाहणी;

काही व्यापाऱ्यांना दिली वैयक्तिक मदत

दोडामार्ग – वार्ताहर

दोडामार्ग बाजारपेठेतील ‘बॉम्बे टेक्सटाइल’ या कपड्यांच्या भव्य शोरूमला गुरुवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत शोरूमचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, आजूबाजूची दुकानेही या आगीच्या झळा बसून बाधित झाली आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज शनिवारी आमदार दीपक केसरकर यांनी घटनास्थळी भेट देऊन शोरूम व इतर दुकाने यांची पाहणी केली.

या आगीची माहिती मिळताच नगरपंचायतच्या अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत बॉम्बे टेक्सटाइल शोरूमचा दर्शनी भाग पूर्णतः जळून खाक झाला होता. आगीचा धूर शोरूमच्या आत भरून राहिल्याने अधिक नुकसान झाले.

या दुर्घटनेनंतर आमदार दीपक केसरकर यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन पीडित व्यापाऱ्यांची विचारपूस केली. त्यांनी काही व्यापाऱ्यांना वैयक्तिक स्वरूपात आर्थिक मदतही केली. यावेळी व्यापारी दीपक कामत यांनी केसरकर यांच्याकडून देण्यात आलेली आर्थिक मदत नम्रपणे नाकारली व “आपण आलात, आमची विचारपूस केली, हेच आमच्यासाठी मोठे आहे,” असे सांगून आभार व्यक्त केले.

या भेटीदरम्यान दत्तराज मळीक, बाबू मळीक, सुहास करमळकर, पोलिस निरीक्षक हेमचंद्र खोपडे, तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, नगरसेवक संतोष नानचे, उपजिल्हाप्रमुख शैलेश दळवी, सज्जन धाऊस्कर, चिरायू गवस तसेच अनेक व्यापारी आणि शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा