You are currently viewing विनायका तू आमचा देव रे

विनायका तू आमचा देव रे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*विनायका तू आमचा देव रे* 

 

गणपती देवा गणराया

भक्ता घरी तू धाव रे

नमन करून पडतो पाया

आम्हा दर्शन देण्या ये रे

 

भक्तीभावे सेवा करतो

विघ्नहरण्या धावून ये रे

कृपा दृष्टी तुझी असू दे

आशिर्वाद आम्हा दे रे

 

भक्त सखा तू पाठीराखा

संकटाला तू पाव रे

वाईट शक्ती नष्ट कर

विनायका तू आमचा देव रे

 

कवी:-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*चांदवडकर ,धुळे.*

७५८८३१८५४३.

प्रतिक्रिया व्यक्त करा